भोरडा
भोरडा : याला भोरडीही म्हणतात. निरनिराळ्या प्रकारच्या मैनांच्या बरोबरच भोरड्याचाही स्टर्निडी या पक्षिकुलात समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव स्टर्नस रोझियस हे आहे. यूरोपचा आग्नेय भाग (इटलीपर्यंत) आणि आशिया मायनरपासून तुर्कस्तानपर्यंतचा आशियाचा भाग यांत रहाणारा हा पक्षी आहे.हिवाळी पाहुणा म्हणून हा भारतात येतो.